Process of mutual consent divorce in marathi
Process of Mutual consent divorce :-
परस्पर संमति ने घेतला जाणारा घटस्फ़ोट - (Mutual consent divorce )
थोडक्यात जाणुन घेऊयात की हा काय प्रकार आहे. हिन्दु विवाह कायदा 1955च्या कलम 13 (बी ) द्वारे आपणास समजते की हिन्दु विवाह कायद्या ने वाद न करता सुद्धा व कोर्टत 4ते 5वर्ष न घालवता सुद्द्दा घटस्फोट घेता येण्याची मुबा दिली आहे. परंतु परस्पर संमति ने घटस्फ़ोट घेण्यासाठी केवळ कलम 13 (बी) न बघता 13 B (1) व 13 B (2) हे देखिल पाहणे गरजेचे आहे.
हिंदू विवाह अधिनियम 1955 च्या कलम १3 B मध्ये असे म्हटले आहे की परस्पर संमतीने घटस्फोटाच्या बाबतीत 18 महिने वेगळे होण्याचा कालावधी आहे. कलम १3 B (१) मध्ये प्रदान केलेला एक वर्ष आणि कलम १3 B (२) मध्ये सहा महिने असा आहे .
येथील कौटुंबिक कोर्टाने हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13 बी (२) अन्वये सहा महिन्यांचा वैधानिक कालावधी अनिवार्य आहे.
परस्पर संमती घटस्फोटयासाठी असणार्या अटी कोणत्या आहेत?(Conditions for mutual consent divorce )
1- पति व पत्नी या दोघांना ही घटस्फोट हवा असला पाहिजे.
2- लग्नाला 1वर्ष पुर्ण झाली असली पाहीजेत.
3- व त्यांचा बरोबर एकमेकांन पासून विभक्ती रहण्याची वेळ ही अधिक असली पहिजे.
4- कोर्टाचे अधिकारक्षेत्र (Jurisdiction ) - सदर बाब ही प्रत्येक याचिकेचा महत्वपूर्ण भाग आहे. परंतु परस्पर संमति ने घटस्फ़ोट या मधे दोन्ही वादी कोर्टचे अधिकार हे निवडू शकतात. विवाह झाला त्यास्थळा चा हद्दीत किंवा ते दोघे जिथे रहात असतिल त्यास्थळाचा हद्दीत कोर्ट निवडू शकतात. तसेच त्याना कोर्टात त्यांचे राहत्यास्थळा ची माहिती देने अनिवार्य असते.
* परस्पर संमति ने घटस्फ़ोट या साठी कोणत्या कोर्टात जावे?
परस्पर संमति ने घेतला जाणार्या घटस्फ़ोट या साठी कौटुंबिक न्यायालयात याचिका एफ (Petition -f ) दाखल करण्यात येते.
* परस्पर संमति ने घटस्फ़ोट घेण्यासाठी कोर्टात कोणती कागदपत्रे लागतात?
याचिका एफ दाखल करण्यासाठी महत्वाचे कागदपत्रे खलील प्रमाणे -
1- लग्न पत्रिका.
(जर विवाह कोर्टत केला असेल विवाह नोंदणीची कागदपत्रे )
2- लग्नाचा फोटो
3- प्रतिज्ञापत्र वादी क्र. 1 व वादी क्र. 2 यांचे प्रतिज्ञापत्र (affidavit).
4- याचिका- एफ दोन्ही वादी यांनी हस्ताक्षर केलेली.
5- वकालत नामा (एक वकील असेल तर एक आणि दोन्ही वादी यांचे वेग -वेगळे वकील असतील तर 2 वकालत नामे असणे आवश्यक आहे ते ही वकिलांचा हस्ताक्षरा सोबत)
*परस्पर संमति ने घटस्फ़ोट, कोर्टात दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ती साठी कोणते कागद पत्रे बनवावि लागतात?
1)- याचिका -एफ ( Petition- F)
1- यचिका - एफ - या मधे सगळे 'दोन्ही वादी यांचा कडुन संपूर्ण माहिती घेणे, जर दोन्ही वादी यांचे वकील, वेग- वेगळे अस्ल्यास ही माहिती परस्पर जाणुन घ्यावी. दोन्ही वादी यांना कोणत्याही गोष्टिंवर आक्षेप नसावा. तसेच याचिके मधील संपुर्ण माहिती ही दोन्ही वादी यांना पुर्ण वाचने बंधनकारक ठेवावे व त्यांनतर काही चूका नसल्यास त्यांचे हस्ताक्षर घ्यावे.
याचिका एफ सोबत जोडावे लागणारे इतर कागदपत्र खलील प्रमाणे-
a) सत्यापन(Verification) - याचिके नंतर दोन्ही वादी कडुन संपुर्ण माहिती सत्य अस्ल्यास 2 वेग - वगेळे सत्यापन (verification) हस्ताक्षरा सहित असणे हे ही याचिके मध्ये नमुद असणे गरजेचे आहे.
b )- संमति अटी (Consent terms)-
संमति ने सर्व अटी मान्य असल्याचे एक पत्र ज्याला संमति अटी (Consent terms)असे म्हणतात ते देखिल असने गरजे चे आहे. ज्यामधे काय करणस्त घटस्फोट घेतोय व, त्या पैकी कोणत्याही वादी चे काही वस्तू व इतर काही देण्याचे राहिले असल्याल, व पत्नी हिस काही रक्कम देण्याचे ठरले असता ती नमुद करावी, व सदर देने-घेणे हे दोघानाही मान्यअस्ल्यास त्या वर दोघांचे ही हस्ताक्षर घ्यावे. या सर्व गोष्टीणा संमति अटी असे म्हणतात.
c ) -प्रतिज्ञापत्र (Affidavit )-
संमति अटी नंतर वादी क्र. 1 व वादी क्र. 2यांचे वेग-वेगळे प्रतिज्ञापत्र तयार करुन दोन्ही वादी यांचे हस्ताक्षर घेऊन ते सदर याचिके सोबत जोडावे.
d )- संबोधित करण्यासाठी दिलेला पत्ता- (Memorandum of address)-
कोर्टा द्वारे काही आवश्यक माहिती, नोटीस किंवा इत्यादि कोणत्या पत्त्यावर यावे तो अपेक्षीत पत्ता नमुद केला जातो. व त्यावर ही वादी क्र. 1व 2यांचे हस्ताक्षर घेतले जातात.
e )- कागदपत्रांची यादी ( List of documents)-
या यादी मधे सर्व कागदपत्रे यांना निशाणी अ ब क प्रमाणे सादर करण्यासाठी लावणे.
f )- वकालतनामा ( Vakaltnama )
वकालतनामा मधे वकिला ची संपुर्ण नाव ,पत्ता व इतर संबोधनाचे मार्ग जसे फ़ोन नंबर इत्यादि माहिती तसेच आम्ही वादी यांना वकील म्हणून या दाव्यासाठी नेमतो अशी माहिती असते.
g ) -रोजनामा ( Roznama )-
रोज़नामा या मधे यचिके पासून सर्व जोड्लेल्या कागदपत्राणची व्यवस्थीत यादी असते व, समोर ते कोणत्या पानावर आहे याचे क्रम ही असतात.
कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल करण्यापासून ते आदेश पारित होण्या पर्यंतचा थोडक्यात आढावा -
थोडक्यात सांगायचे झाले तर न्यायालया मधे याचिका ही, भरणे विभागत प्रस्तुत केली जाते व ,काही थोडके आक्षेप ही घेतले जातात, व ते वकिलांद्वारे काढून ही टाकले जातात. त्यानंतर केस ची पहिली तारीख संबोधीत माध्यमांद्वारे वादी व वकील यांना सांगण्यात येते. त्याच बरोबर केसचा नंबर ही देण्यात येतो.
पहिल्या तारखेला वादी क्र. 1 व वादी क्र. 2 यांचे समुपदेशन केले जाते पण जर त्यातूनही दोघे घटस्फ़ोट घेण्यासाठी ठाम असल्यास दोघांना 6महिन्याचा वैधानिक कालावधी दिला जातो.
6 महीन्यात नंतर जर दोन्ही वादी सदर प्रकरणाच्या तरखी ला उपस्थित राहुन घटस्फ़ोट घेण्यावर ठाम राहिले तर कोर्ट त्याना घटस्फ़ोट घेण्याचे आदेश पारित करते.
याचिका दाखल झाल्यापासून, फक्त 6 महिन्यांचा कालावधी नंतर दोघे ही घटस्फ़ोट घेऊन आपल्या पति पत्नी या नात्यातून स्वतंत्र होतात.
परस्पर संमति ने घेतला जाणारा घटस्फ़ोट प्रस्तुत करणे व याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या सर्व गोष्टी निदर्शनास आणणे आवश्यक आहे.
नोट- (सदर प्रक्रिया ही प्रत्येक स्तरा प्रमाणे आखली जाते उदाहरण म्हणजे-जिल्हा स्तर- राज्य स्तर आदी. कृपया याची मददत म्हणून वाचन करा. व एखादा कोर्टात जाऊन याचा आढावा घ्यावा.)

Comments
Post a Comment