Social contract theory in marathi
Social contract theory
एक असा सामाजिक करारा चा सिद्धान्त आहे, जो अस सांगते की एक राज्य हे बिना सरकार च चालू शकते. पण राज्य मधील समाज सुव्यवस्थित राहण्या साठी या सामाजिक कराराची गरज आहे.
पण हे शक्य कस आहे त्या साठी ही सामाजिक कराराचा सिद्धांत (social contract theory) जाणून घेणे आवश्यक आहे. आता तीन असे व्यक्ती ज्यांनी हा सिद्धांत जगा समोर मांडला. त्यातील पहिली व्यक्ती म्हणजे
Thomas Hobbes-
Thomas Hobbes - हे असे म्हणतात की एक राज्य किंवा देश असा आहे जिथे सरकार किंवा कायदा अस्तित्वात नाही. ज्या मुळे राज्यातील लोकांना तीन गोष्टींना सामोरी जावे लागेल.
पहिलं - स्पर्धा (compitition) श्रेष्ठत्व की मी महान आणि शक्तिशाली
दुसरे - गौरव ( Glory) - मी गौरवशाली तर माझे वरचास्व निश्चित
आणि
तिसरे- भीती (fear) या दोन कारणानं मुळे जीवित हानी होण्याची भीती.
या तीन गोष्टी ज्या गांभीर्याने विचारात घेऊन त्यावर पर्याय म्हणून. सामाजिक करारा चा सिद्धांत अस्तित्वात आणला पाहिजे.
- सामाजिक करारा चे कार्य (function of social contract)
१ . हा करार सर्व समाजाने सही करून अस्तित्वात आणणे ज्यावर असे नमूद आहे की कोणीही एका - मेकाशी भांडण वाद करणार नाही .
२. जो अस करेल तो हा करार भंग केल्या कारणे शिक्षेस पात्र राहील.
३. ही शिक्षा व दंड देण्यासाठी या करारा द्वारे एका व्यक्ती ची निवड केली जाईल जो करार भंग झाल्याची पूर्ण दक्षता घेईल व असे करणाऱ्यास योग्य ते दंड देईल.
४.- ही व्यक्ती जो एक अधिकारी किंवा अशी व्यक्ती असेल ज्याची उत्पत्ती करारात सहभागी असलेला समाज त्यांचा मते ठरवेल.
या सर्व गोष्टी सामाजिक करारा च्या कार्या मधे असतील. असे Thomas hobbes यांचे मत होते.
John Locke-
आता या सिध्दांत चे दुसरे प्रस्तावक म्हणजे John locke
हे या सिद्धांतां शी सहमत होते पण काही गोष्टी त्यांना मान्य नाही असे दिसते, त्यांनी या मधे सुधारणा करून या सिद्धांतास प्रस्ताविक केले. John locke यांनी मांडलेल्या गोष्टी आपण थोडक्यात समजून घेवू.
१. यांनी Thomas Hobbes च्या सिध्दांतास समर्थन केले परंतु त्यांचे असे मत होते की फक्त जीवन जगण्याचा अधिकार (right to life) या द्वारे सुरक्षित करणे म्हणजे बाकी सर्व अधिकार (sovereign power) अधिकाऱ्यास देणे असा होतो.
२. जे मानवी जीवन व्यतीत करण्यास अत्यंत चुकीचे आहे. मानवी जीवनासाठी त्याचे स्वातंत्र्य बहाल करणे ही शिक्षा आहे. त्या मुळे या मधे फक्त जगण्याचा अधिकार नाही तर स्वातंत्र्य चा अधिकार सुरक्षित करणे आवश्यक आहे.
३. व John locke त्या सिद्धांत मधे स्वातंत्र्यचा अधिकार (right to liberty) नमूद करतात.
४. त्याचबरोबर ते संपत्ती चा अधिकार (right to property) ही समाजा मधे असणे महत्वाचे आहे असे सांगतात हा अधिकार देखील या करारा द्वारे सुरक्षित करणे गरजेचे आहे. कारण प्रत्येक व्यक्ती ची कमाई- जमीन इत्यादी गोष्टींची आवक वेगळी असू शकते व ते ठेवण्या बरोबर त्याचा वापर करण्याचा हक्क देखील त्यास आहे.
त्याचबरोबर असे ही म्हणतात की जी sovereign power किंवा अधिकारी आहे त्यांचा कडे मर्यादित शक्ती असणे गरजे चे आहे. ते फक्त या करारा मधील नमूद गोष्टीनं पुरतेच दंड देऊ शकतात.
उदाहरण - जर एखादी दुसऱ्या ची मालमत्ता चोरी करते तरच ते या वर कारवाही करू शकतात व त्यास शिक्षा देऊ शकतात. पण एखाद्या चा घरी किरकोळ भांडण झाले किंवा पती पत्नी मददे वाद झाले तर त्यास शिक्षा करू शकत नाही.
या गोष्टींचा समावेश करून ते ह्या सामाजिक करार सिध्दांत यास पूर्ण असल्याचे सांगतात.
Jean-Jacques Rousseau
आता या सिद्धांतचे आपले तिसरे प्रस्तावक म्हणजे Jean-Jacques Rousseau चे हे वाक्य या सिध्दांत कडे पाहण्याचा दृष्टिकोन सूचित करतो.
"Man is born free everywhere he is in chain"
१. ते असे म्हणतात की हा सिध्दांत समाजाची प्रगती करत आहे. पण यामुळे भ्रष्टाचार वाढत आहे.
२. जेव्हा राज्य सामाजिक करारा (Social contract) पूर्वी अस्तित्वात होते, तेव्हा मानवाचे भ्रष्टाचार करण्याचें कारण नव्हते.
३. पण जसा एका (sovereign power ) किंवा अधिकारी याचा जन्म झाला तसे भ्रष्ट राज्य देखील अस्तित्वात आले आहे.
४. असे असल्याकारणे अधिकारी यास योग्य व प्रामाणिक पणे कार्य न केल्याने, बदलण्याची तरतुद या सामाजिक करारा मधे समाविष्ट करणे गरजेचे आहे.
५. नाहीतर एकच व्यक्ती स्वतःला राजा समजू शकतो कारण त्याच्याकडे शिक्षा देण्याचा अधिकार आहे.
या गोष्टींचा समावेश नंतर हा सामाजिक करार सिध्दांत पूर्ण होतो असे Jean-Jacques Rousseau यांना वाटते व त्याचा समावेश करून ते सामाजिक करार सिध्दांत प्रस्तुत करतात.
नोट – अगदी थोडक्या शब्दात व सोप्या भाषेत आपणास माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अशा आहे आपल्यास अभ्यासाचा दृष्टी ने उपयोगात येईल.
Comments
Post a Comment